Chinchwad : नाल्यावरील अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी कंपनीत; लाखो रुपयांचे नुकसान

एमपीसी न्यूज – कंपनीसमोरून वाहणा-या नाल्यावर अतिक्रमण झाले. यामुळे नाला बुजला गेला. आज (शुक्रवारी) झालेल्या पावसाचे पाणी वाहण्यासाठी नाला नसल्याने थेट आसपासच्या कंपन्यांमध्ये शिरले. हा प्रकार चिंचवड एमआयडीसीमध्ये घडला.

रंगनाथ गोडगे यांची चिंचवड एमआयडीसीमध्ये जय श्री स्वामी समर्थ इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. कंपनीसमोरून एक नाला वाहत आहे. मात्र, या नाल्यावर काही दिवसांपूर्वी अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणामुळे नाला बुजून गेला आहे. पावसाचे पाणी नाल्यातून वाहण्याऐवजी थेट रस्त्यावर येते. रस्त्यावर पाणी पोचल्यानंतर वाट मिळेल त्या दिशेला निघून जाते.

शुक्रवारी दुपारी पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्रच मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. तर काही नाले भरून वाहू लागले. मात्र, रंगनाथ यांच्या कंपनीसमोर असलेला नाला अतिक्रमणाच्या विळख्यात अडकून बूजला गेला असल्याने नाल्यातून जाणारे पाणी रस्त्यावर साचले. गुडघाभर पाणी रस्त्याला साचल्यानंतर सर्व पाणी वाट मिळेल त्या दिशेने वाहू लागले.

_MPC_DIR_MPU_II

पावसाचे पाणी रंगनाथ यांच्या कंपनीत शिरले. कंपनीत सुमारे चार ते पाच फूट उंच पावसाचे पाणी साचले. कंपनीतील मशीन आणि कच्चा माल संपूर्ण पाण्यात गेला. मशीनच्या मोटारीमध्ये पाणी गेल्याने मोटारी बंद पडल्या. कच्चा माल भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. केवळ अतिक्रमणाच्या विळख्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.