Alandi : आळंदीमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये (Alandi) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटसहित जोरदार हजेरी लावली.
अचानक झालेल्या या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाने भिजू नये यासाठी अनेक नागरिक दुकानांचा, इमारतींचा आसरा घेत होते. रस्त्यावर शहरात विविध ठिकाणी पाणीच पाणी वाहत होते.
Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात गारांचा जोरदार पाऊस
वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे, फांद्या हलताना दिसत होत्या. यावेळी विद्युत विभागाने शहरातील विद्युत पुरवठा खंडित केला होता.