Raina Thanks PM : पंतप्रधानांनी कौतुकाने आमची पाठ थोपटणं हा सर्वोच्च सन्मान – सुरेश रैना

एमपीसी न्यूज – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर अवघ्या काही मिनिटांतच रैनाने निवृत्तीची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही खेळाडूंना पत्र लिहून त्यांनी भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत. पंतप्रधानाच्या पत्रानंतर सुरेश रैनाने त्यांचे आभार मानत पंतप्रधानांनी कौतुकाने आमची पाठ थोपटणं हा सर्वोच्च सन्मान असल्याचे त्याने म्हटले आहे. 

सुरेश रैनाने या पत्राबद्दल आभार मानताना भावनिक ट्विट केले आहे. तो म्हणाला की, आम्ही आमच्या देशासाठी खेळताना आमचं सर्वस्व पणाला लावतो आणि घाम गाळतो. देशातील नागरिकांकडून आणि चाहत्यांकडून मिळणारं प्रेम हेच आमच्यासाठी प्रेरणास्थान असतं. त्यातच देशाच्या पंतप्रधानांनी आमची पाठ कौतुकाने थोपटणं हा तर सर्वोच्च सन्मान आहे. यापेक्षा आणखी वेगळं काय हवं.

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमच्या कौतुकाच्या शब्दांनी मी भरून पावलो. जय हिंद!, अशा शब्दात रैनाने पत्राबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकाच दिवशी निवृत्ती स्वीकारणाऱ्या धोनी आणि रैनाबद्दल आपल्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या. पत्रात मोदी यांनी या दोन खेळाडूंच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.