Pimpri : पिंपरी पालिकेत महात्मा गांधी यांचा पुतळा उभारावा 

आम आदमीची मागणी 

एमपीसी  न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आशिया खंडात सर्वात श्रीमंत महापालिका असून याच महापालिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा नाही ही खेदाची बाब आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आम आदमी पार्टीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे, देशातल्या बहुतेक सर्व छोट्या मोठ्या शहरात गांधीजींचा पुतळा आहे. मात्र इतकी जुन्या व मोठ्या महापालिकेत गांधीजींचा पुतळा नसावा ही खेदाची गोष्ट आहे.लोकांनी  महात्मा गांधी जयंती कशी साजरी करायची असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.   म्हणून २ ऑक्टोबरला गांधीजीची १५० वी जयंती  आहे. तरी  महापालिका आयुक्त, विरोधी पक्ष नेते दत्ता साने, व महापौर राहुल जाधव  यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालावे असेही म्हटले आहे.

या वेळी आपचे  वहाब  शेख , कपिल मोरे, रागवेंद्रा राव, यशवंत कांबळे, अनूप शर्मा, सुजोय शेट,  सचिन सोनकांबळे, प्रकाश पठारे, चेतन बेंद्रे, सुशील अजमेरा, एकनाथ पाठक, अखिलेश यादव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.