Raj Thackeray : महाराष्ट्रातून वेदांत प्रकल्प वळवलाच कसा? या विषयाची सखोल चौकशी व्हावी!

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील हजारो लोकांना रोजगार मिळवून देणारा पुण्यातील वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर हा प्रोजेक्ट गुजरातला वळवण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या विषयाची सखोल चौकशी व्हावी असे मत मांडले आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून म्हंटले आहे, कि फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Vedanta Project : पुण्यातील वेदांत प्रकल्प गुजरातला वळवला; आदित्य ठाकरे यांचे शिंदे सरकारवर टीकास्त्र

तसेच हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं, असे मत त्यांनी (Raj Thackeray) मांडले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.