Pune : पुण्यात नाही पाण्यात राहतो म्हणून सांगा – राज ठाकरे

पुण्यात पावसाचे पाणी तुंबल्यावरून राज ठाकरे यांचा संताप

एमपीसी न्यूज – केवळ अर्धा तास पुण्यात पाऊस झाल्याने शहराचा विचका झाला. पुण्यात राहतो म्हणून सांगू नका, पाण्यात राहतो म्हणून सांगा, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केला.

सरकारला जाब विचारण्याची माझ्यात आग आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना ब्र काढण्याचीही परवानगी नसते. राज्याला सक्षम, कणखर, प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. त्यासाठी मनसेला मत द्या, असे आवाहनही राज यांनी केले. बँकांचे घोटाळे होत आहेत. लोक बाहेर रडत आहेत. तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला काढता येत नाही. पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक भाजपच्या माणसांची आहे. शेतकरी, महिला, कामगार ओरडत आहेत. तरुणांना रोजगार नाही. हे सर्व विचारण्यासाठी मला सत्ता नको तर, प्रबळ विरोधी पक्ष करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like