Rupali Thombre : राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे; रुपाली ठोंबरे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बर्थडे केले असून 30 हून अधिक आमदार सध्या गुवाहाटीत जाऊन बसले आहेत. राज्याच्या राजकारणात यामुळे मोठी खळबळ उडाली असून मालकास आघाडी सरकार धोक्यात आहे की काय असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष टाळण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombre)  यांनी  केले आहे. 

 

PCMC Guidelines : नैसर्गिक आपत्तीपासून जीवितहानी टाळण्यासाठी मार्गदर्शक सुचनांचे पालन करा, महापालिकेचे आवाहन

 

रुपाली ठोंबरे म्हणाल्या, राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला महाराष्ट्रातली जनता वैतागली आहे. उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील हे दोघेही हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच लेकरे आहेत. अशा परिस्थितीत हिंदुत्व हिंदुत्व म्हणणाऱ्यांनी संकटात सापडलेल्या भावासाठी समोर यावे आणि पूर्वीची भांडणे विसरून एकत्र यायला पाहिजे हे हिंदुत्व शिकवते. ज्याप्रमाणे लक्ष्मण रामासाठी उभा राहिला होता तसेच हिंदुत्व लोकांना शिकवणाऱ्यांनी भावासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.

 

Pune Crime News : वारीत घुसलेल्या मोबाईल चोर टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

 

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज असल्याचे जगाला दाखवून देण्यासाठी या दोन्ही भावांनी एकत्र यावे. जेव्हा हिंदुत्वाच्या गप्पा आपण करत असतो तेव्हा हिंदूतवाचे त्यांचे सर्व पैलू स्वीकारले पाहिजे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन जगाला बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घालून द्यावा, अशी विनंतीही रूपाली ठोंबरे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.