Raj Thackeray : तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतंय – राज ठाकरे

जिम पुन्हा सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक व बॉडीबिल्डर्स यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. : You open the gym, let's see what happens - Raj Thackeray

एमपीसी न्यूज – देशात अनलॅाक तीनच्या अंतर्गत विविध आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्यात अद्याप जिम सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिम पुन्हा सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक व बॉडीबिल्डर्स यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी ‘तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतंय’ असा सल्ला त्यांना दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझं बोलणं झालं आहे. त्यांचंही म्हणणं आहे की, जिम सुरु झाल्या पाहिजेत. आता मी सांगतो, जिम सुरु करा, ज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. बघू काय होतं’.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? प्रत्येकाने आपली काळजी घ्या, तसेच प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने जारी केलेल्या गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या.’ असं आवाहनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले, केंद्र सरकार सांगतय, जिम सुरु करा, विमानतळ सुरु करा. राज्य म्हणतयं, आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?’ असा टोला ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

सगळ्या लोकांची काळजी घ्या, कोरोना संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्या व रोगप्रतिकार शक्ती वाढवा, असा सल्ला देत त्यांनी जिम व्यावसायिकांना जिम सुरू करण्याचा सल्ला दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.