Rajbhavan : राजभवनाला राज्य शासनाकडून मागच्या 2 वर्षात 60 कोटींहून अधिक रक्कम

एमपीसी न्यूज : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य शासन (Rajbhavan) यांच्यामध्ये वाद सुरु असतानाच आता नव्या वादाने तोंड वर काढले आहे. राज्यशासन प्रत्येक वर्षी राजभवनाला मोठ्या प्रमाणात निधी देत असतो. 60 कोटींहून अधिक रक्कम मागच्या 2 वर्षात दिल्याची माहिती समोर आली आहे. हि माहिती ‘माहिती अधिकार’ कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराद्वारे समोर आली. मागील 2 वर्षात 2019  च्या तुलनेत 18 कोटींची वाढ झाली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राजभवन कार्यालयामध्ये राज्य सरकारकडून येणाऱ्या अनुदानाची माहिती महाराष्ट्र शासनाकडे मागितली होती. त्यामार्फत त्यांना अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तिकेमधून अंतर्गत मागच्या 5 वर्षाची माहिती देण्यात आली. ज्याचा आढावा (Rajbhavan) पुढीलप्रमाणे :

Pimpri News : सहा पंपहाऊसची दुरुस्ती; पाऊणकोटींचा खर्च

1. 2017-18 – 13 कोटी 97 लाख 23 हजार

खर्च : 12 कोटी 49 लाख 72,000 लाख

2. 2018-19 – 15 कोटी 84 लाख 56,000 रुपये

खर्च : 13 कोटी 71 लाख 77,000

3. 2019-20 – 19 कोटी 86 लाख 62,000

खर्च : 17 कोटी 63 लाख 60,000

4. 2020-21 – 29 कोटी 68 लाख 19,000 मागणी असताना प्रत्यक्ष रक्कम – 29 कोटी 50 लाख 92,000

खर्च : 25 कोटी 92 लाख 36,000

5. 2021-22 – 31,23,66,000 रक्कम तरतूद असताना, शासनाने 31,38,66,000 रक्कम दिली. ज्यापैकी राज्यपाल कार्यालयाने 27,38,56,000 इतका खर्च केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.