Vadgaon Maval : वडगांव मावळ येथे राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव संपन्न

कोरोनाचे सर्व नियम पाळून केले साधेपणाने नियोजन

एमपीसी न्यूज : वडगांव मावळ येथे नुकताच 3 दिवसीय राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव संपन्न झाला.  महोत्सवाचे हे 42 वे वर्ष होते.

शिवप्रतिमा पूजन श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे,  माजी  सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगांव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर, मनोज ढोरे, लहू भिलारे, ज्येष्ठ मार्गदर्शक पंढरीनाथ भिलारे, नारायण ढोरे , सोमनाथ काळे, चंद्रकांत राऊत, वसंत भिलारे, सुरेश कुडे, दिलीप मुथा, संभाजी येवले आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले

दुपारच्या सत्रात नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे यांच्या हस्ते आणि डॉ. जयश्री पवार, डॉ.सुनील बाफना, डॉ.कुंदन बाफना,  डॉ.दिनेश दाते, डॉ.अक्षय काटे, डॉ.गौरव ओसवाल, डॉ.पालवे मॅडम, डॉ. वैशाली ढोरे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

क्रस्ना डायग्नोस्टिक यांचे वतीने अत्याधुनिक यंत्रणेद्वारे हाडांची तपासणी तसेच इतर मान्यवर डॉक्टर यांच्या मार्फत नेत्ररोग तपासणी , कोविड 19 स्कॅनिंग कॅम्प, हिमोग्लोबिन आणि मधुमेह तपासणी इ मोफत तपासण्या करण्यांत आल्या, काही गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप तर क्रस्ना डायग्नोस्टिक यांचे वतीने एच आर सी टी या सिटी स्कॅन च्या सवलत कुपनांचे वाटप देखील करण्यात आले.

याप्रसंगी धनश्री भोंडवे, वैशाली ढोरे, वैशाली म्हाळसकर , हर्षदा दुबे , कांचन ढमाले, अश्विनी बवरे, सुषमा जैन, अंजली भोसले, श्रेया भंडारी, शितल मुथा, किरण आगळे, भक्ती जाधव, पूजा पिंगळे,  प्रज्ञा लोखंडे, शैला शिंदे, संगीता खेंगले, संगीता ढोरे, सुवर्णा गाडे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.

सुमारे 156 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या महोत्सवाच्या निमित्ताने खालील मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्व मनोरंजन आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्यामुळे सदर मान्यवरांना त्यांच्या घरी जाऊन समितीच्या वतीने पुरस्कार देण्यात आला , या सर्व पुरस्कारार्थी मान्यवरांनी या बद्दल संयोजन समितीचे मनापासून आभार मानले.

पुरस्कारार्थी

*राजमाता जिजाऊ पुरस्कार* –  सुशीला अण्णासाहेब शेलार

*कृषिनिष्ठ पुरस्कार* – धोंडिबा विठ्ठलराव जाधव

*कर्तव्यदक्ष पुरस्कार-*

डॉ.भगवान अंतू पवार – जिल्हा आरोग्य अधिकारी , पुणे

*हृदयमित्र समाजभूषण पुरस्कार* – लायन हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल

*क्रीडारत्न पुरस्कार* –  तानाजीराव संभाजीराव काळोखे

सकाळी शिवज्योत स्वागत करण्यासाठी आले त्यानंतर सहजयोग केंद्राच्या सुरेखा ढमाले ,अर्चना कुडे, सुनीता कुडे , कांता जाधव ,सुरेखा अंगडी ,सुनीता बोराडे , सुनीता भराडी , लक्ष्मी मालपोटे या महिला समिती सदस्यांनी पाळणा म्हणून शिवजन्मोत्सव साजरा केला.

सायंकाळी मोठ्या मिरवणूकीचे आयोजन न करता राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीची टाळ मृदुंगाच्या गजरात ग्राम प्रदक्षिणा अत्यंत मोजक्या समिती सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने यावेळी पालखीवर पुष्पवृष्टी देखील केली.

महोत्सवाचे हे 42 वे वर्ष असून आरोग्य विषयी उपक्रम राबवून कोरोना बाबतीत शासनाचे सर्व नियमांचे पालन करून महोत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी दिली.

संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजे शिवछत्रपती जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अमोल पगडे, कार्याध्यक्ष शंकर भोंडवे ,कार्यक्रम प्रमुख दिनेश ढोरे,उपाध्यक्ष अनिल ओव्हाळ , निलेश द.म्हाळसकर , समीर गुरव , खजिनदार अतुल म्हाळसकर, सह खजिनदार अतुल राऊत, सचिव शेखर वहिले,सह सचिव मंदार काकडे, प्रसिद्धी प्रमुख विकी द.म्हाळसकर , केदार बवरे आदींनी नियोजन केले

मा.उपसभापती शांताराम कदम, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, अ‍ॅड.विजय जाधव , प्रसाद पिंगळे , किरण म्हाळसकर, शामराव ढोरे, ग्राहक मंच राज्य सचिव अरुण वाघमारे, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, रविंद्र म्हाळसकर , रविंद्र काकडे , रमेश ढोरे, दिपक भालेराव, प्रशांत चव्हाण, योगेश म्हाळसकर,चंद्रशेखर म्हाळसकर, विठ्ठल घारे, सुरेश गुरव, दिपक पवार, अनिस तांबोळी, नामदेव भसे, नामदेव वारींगे , नितीन गाडे, सोमनाथ धोंगडे, संतोष ढमाले आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन अनंता कुडे आणि भूषण मुथा यांनी केले आणि अध्यक्ष अमोल पगडे यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.