Pune News : महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश मुथा 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश मुथा यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी राजेश मुथा यांच्याकडे पदभार दिला. यावेळी कुलकर्णी यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा आढावा सादर केला.

महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारणीमध्ये सचिव जयेश अकोले, सामाजिक सचिव संकेत सुरी, खजिनदार शशिकांत वाकडे, संचालक समीर गांधी, संचालक रोहन उपसानी, संचालक संजय कुलकर्णी, संचालक  संजय देशमुख, कार्यकारणी सदस्य नरेंद्र पवार यांची निवड झाली आहे.

राजेश मुथा म्हणाले, ‘एक देश, एक धोरण’यासाठी प्रयत्नशील असण्याबरोबर सौरउर्जा धोरण बणविण्यासाठी केंद्र सरकार आणि प्रशासकिय पातळीवर मार्गदर्शक मदत करणे. ग्राहक आणि उत्पादक असोसिएशनबरोबरच पर्यावरण आणि सौरउर्जा विषयात काम करणा-या संस्थांशी सलग्नता वाढवण्यावर नविन कार्यकारणीचा भर असल्याची माहिती मुथा यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.