Rajesh Tope News : दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी – आरोग्य मंत्री

एमपीसी न्यूज – दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित आहेत. वैज्ञानिकांनी खात्री दिली असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज (बुधवारी) राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. टोपे म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ‘आधी तू घे, मग मी घेतो’, अशी मानसिकता दिसत आहे.

मात्र, त्यांचे समुपदेशन, आयईसी केले जात आहे. छोटे व्हिडीओ रेकॉर्ड करून सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवले जात आहेत.

राज्यात आतापर्यंत 54 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मूळात लसीकरणाचा ॲप स्लो पध्दतीने चालत आहे. दुसरी गोष्ट नागरिकांना डबल डबल नावे जात आहेत. सगळ्या गोष्टीमुळे लोकांच्या मनात कन्फ्युजन असते. ते दुरुस्त करण्याचे काम केंद्रस्तरावर सुरू आहे.

केंद्राच्या या गोष्टी वारंवार निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यामुळे त्यात सुधारणा होईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

व्हॅक्सीनबाबत चुकीचे विधान माध्यमातून जाऊ नये आणि कन्फ्युजन होऊ नये, याची काळजी माध्यमांनी घ्यावी, असे आवाहनही राजेश टोपे यांनी माध्यमांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.