Pune: पुणे शहर भाजपच्या सरचिटणीसपदी येनपुरे, नागपुरे, घोष यांची निवड

rajesh yenpure, ganesh ghosh, deepak nagpure elected as a secretary of pune bjp

एमपीसी न्यूज- गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पुणे शहर भाजपच्या सरचिटणीसपदी अखेर नगरसेवक राजेश येनपुरे, गणेश घोष, दीपक नागपुरे यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे शहराच्या अध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड होऊन आता 5 महिने झाले आहेत. त्यानंतर सरचिटणीस पदावर काम करण्यासाठी 4 जणांना संधी देण्यात आली आहे.

यापूर्वी शहराध्यक्ष पदासाठी कमालीची स्पर्धा होती. स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांच्या नावाला खासदार गिरीश बापट यांनी कडाडून विरोध केला होता.

त्यानंतर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे म्हणून मुळीक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर मुळीक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलनाचा धडाकाच सुरू केला आहे.

विविध माध्यमातून ते सरकारवर टीका करीत असतात. पुण्यात कोरोनाचे संकट आटोक्यात येत नसल्याने मुळीक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राजेश पांडे यांच्यासह, गणेश घोष राजेश येनपुरे आणि दीपक नागपुरे यांना संधी देण्यात आली आहे.

पण, इतर कार्यकारिणीची निवड होणे बाकी आहे. ती कधी होणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे. कोरोनाचा संकटामुळे कार्यकारिणी थांबली आहे. अखेर रविवारी प्रदेश भाजपतर्फे नव्या सरचिटणीसांची घोषणा करण्यात आली.

पक्षाच्या संघटनात्मक कार्यात पांडे यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्यांच्या सोबतीला आणखी तीन जणांची निवड करण्यात आली आहे. गणेश घोष यांना पुन्हा सरचिटणीसपदी संधी देण्यात आली आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजेश येनपुरे अतिशय अभ्यासपूर्ण मत मांडत असतात. त्यांनाही पक्षाने संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सक्रीय असणाऱ्या दीपक नागपुरे यांनाही संघटनेत सामावून घेण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी मंजुषा नागपुरे या पुणे महापालिकेत नगरसेविका आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like