Pune : हौशी गिर्यारोहकांनी राजगडावर साजरा केला दीपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज –  दिवाळीत सगळीकडे आनंद आणि उत्साह पसरलेला असतो. दिवाळी म्हणजे वर्षातला सगळ्यात मोठा सण. सगळीकडे दिव्यांची आरास, फराळाची रास, उटणं, अभ्यंगस्नान, अत्तर, नवीन कपडे, नवीन वस्तू, दागिने, कुटुंब, मित्रमैत्रिणी,आनंद म्हणजे दिवाळी. आणि अशी दिवाळी फक्त आणि फक्त स्वराज्यातच होऊ शकते.  पुणे जिल्ह्यातील काही दुर्ग संवर्धक संस्था आणि या संस्थेचे दुर्गप्रेमी युवक राजगडावर दिवाळीत दिपोत्सव  साजरा केला. 

यावेळी  या उपक्रमात शिवकाळातील आठवणींना उजाळा देण्याबरोबरच आपल्या ऐतिहासिक ठेव्यांविषयी युवकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न व्हावी या हेतूने आयोजन केले जाते. यावेळी राजगडाची स्वच्छता, गडावर दीपोत्सव, गडपूजन असा उपक्रम राबवले जातात. राजगडावरील सदर तसेच सर्व दरवाजे, बालेकिल्ला, पद्मावतीदेवीचे मंदिर, रामेश्वर मंदिर, सुवेळा माची या सर्व वास्तूंची स्वच्छता आणि सजावट आणि दिपोत्सव हे कार्यकर्ते उत्साहाने करतात.
यावेळी मारुती गोळे, सुशिल दुधाणे, अभिषेक मुळे व डॉ.अजय इंगळे यांना सह्याद्री भक्त हे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच गडझुंजार मावळे प्रतिष्ठान चे अमृत पाटील ,  सरहद चे मयूर दादा मसूरकर व भटकंती गड दुर्गाची चे आयोजक राहुल दादा नलावडे, तसेच दानवले पाटील व राजेंद्र फरांदे व अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.