Rajgad News : चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला केले अटक

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण (Rajgad News) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून एका आरोपीला अटक केली आहे. संदीप कौधर (वय 40 वर्षे, रा. दादा शिंदे यांच्या भाड्याच्या खोलीत चिलाडी फाटा, तालुका भोर, जिल्हा पुणे) या आरोपीस अटक करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी राजगड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अशोक शेळके (स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण) यांनी तपास पथक तयार करून सदर गुन्ह्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या. राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार अजय घुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक मदतीने राजगड पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 380 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित इसम हा कापूरहोळ येथील अमृता हॉटेल येथे असल्याची माहिती मिळाली.

या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने (Rajgad News) सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव संदीप कवधर असे सांगितले. त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, तो गुन्हा त्यानेच केला असल्याची कबुलीही दिली. या अनुषंगाने आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलीस हवालदार सचिन घाडगे, पोलीस हवालदार अजित भुजबळ, पोलीस हवालदार विजय कांचन व पोलीस हवालदार अजय घुले यांनी केली आहे.

Mulshi Crime : मोक्कांतर्गत गुन्ह्यांमधील गेल्या दोन वर्षांपासून फरारी असलेले आरोपी जेरबंद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.