Rajgurunagar : झाडांच्या छाटणीमुळे पक्ष्यांच्या सुमारे 80 पिल्लांचा मृत्यू

Rajgurunagar: About 80 chicks die due to pruning

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात राजगुरुनगर येथील तहसील कचेरीतील झाडांची छाटणी करणे पक्ष्यांच्या जीवावर बेतल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. झाडांची छाटणी केल्यामुळे 70 ते 80 पक्ष्यांचा मृत्यू झाला. यामध्ये पाणकावळे आणि बगळ्यांच्या पिल्लांचा समावेश आहे. या घटनेमुळे प्राणीमित्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, राजगुरुनगर येथील तहसील कार्यालय आणि पोस्ट ऑफिस परिसरात वडाची आणि अशोकाची जुनी झाडे आहेत. या झाडांवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतात. या पक्ष्यांची विष्ठा खाली पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.

त्यामुळे काल (शनिवारी) या झाडांची छाटणी करण्यात आली.  ही छाटणी करीत असताना झाडावरील अनेक पक्षांची घरटी खाली पडली. या घरट्यातील पाणकावळा आणि बगळ्यांची 70 ते 80 पिल्लं जमिनीवर पडल्याने दगावली आहेत.

दरम्यान पुण्यातील वाइल्डलाइफ रेस्क्यू टीमच्या पथकाला या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचली यावेळी त्यांना पान कावळा आणि बगळ्याची विखुरलेली 100 हून अधिक पिल्ले सापडली. ही सर्व तुटलेल्या झाडाच्या फांदी खाली अडकून पडली होती शिवाय दगावलेली 70 ते 80 पिल्लेही या ठिकाणी सापडली.

सध्या जिवंत पिल्लांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.