Rajgurunagar : एसटी बसच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू

845

एमपीसी न्यूज- एसटीची धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात
राजगुरूनगर-कडुस रस्त्यावर वडगावपाटोळे येथे झाला.

HB_POST_INPOST_R_A

संदीप शेटे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, बायडाबाई दादाभाऊ बच्चे (वय-३५) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या डोक्याला मोठ्या जखमा झाल्या आहेत.

खेड तालुक्यात दिवसेंदिवस एसटीच्या अपघातात वाढ होत आहे. यामुळे एसटीच्या चालकांच्या कामकाजाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. एसटी व दुचाकीच्या अपघाताचा रात्रीच्या सुमारास पंचनामा करण्यात आला. घटनेची माहिती राजगुरूनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: