Rajgurunagar : डोंगर उतारावरील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे पूर्ण करा – आमदार दिलीप मोहिते पाटील

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, भोर, वेल्हे, मावळ या तालुक्यातील गावांना पावसाळ्यात दरड कोसळून आपत्ती होण्याचा धोका आहे. : Complete disaster management in hill villages - MLA Dilip Mohite Patil

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसह खेड तालुक्यात डोंगर उतारावर वसलेल्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे व सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात आमदार मोहिते पाटील यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविले. त्यात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, भोर, वेल्हे, मावळ या तालुक्यातील गावांना पावसाळ्यात दरड कोसळून आपत्ती होण्याचा धोका आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसेच खेड तालुक्यातील भोरगिरी, पदरवस्ती, भोमाळे ही गावे डोंगर उतारावर वसलेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या गावांमध्ये दरड कोसळून माळीणची पुनरावृत्ती होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.

सध्या पावसाळा सुरू झाला असून या धोकादायक गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे करणे गरजेचे आहे. मात्र, या गावांमध्ये अद्यापही अशी कामे झालेली नाहीत.

परिणामी मुसळधार पाऊस सुरु झाल्यास या गावात मोठा धोका होऊ शकतो. तो टाळण्यासाठी तातडीने उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.