Rajgurunagar Crime News : खेडमध्ये लहान भावाकडून मोठ्या भावाचा निर्घृण खून

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात लहान भावाने मोठ्या भावाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आईला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून हा खून केल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

शंकर मारुती वाडेकर (वय 55) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजेंद्र मारोती वाडेकर (वय 47) याला पोलिसांनी अटक केली आहे. खेड तालुक्यातील वाडा गावात हा प्रकार घडला.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वाडेकर कुटुंबीय खेड तालुक्यातील वाडा गावात राहतात. आज सकाळच्या सुमारास शंकर वाडेकर यांनी आईला मासे बनवून दण्यासाठी सांगितले होते. परंतु, आज चतुर्थी असल्यामुळे आईने मासे बनवून देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने शंकरने आईला शिवीगाळ केली होती.

आईला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा राग राजेंद्र वाडेकर यांना आला होता. याच रागातून त्यांनी शंकर वाडेकर यांच्या पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

खेड पोलिसांनी राजेंद्र वाडेकर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत भोसले करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.