Rajgurunagar Crime News : धक्कादायक;  राजगुरूनगरमध्ये जमिनीच्या वादातून जिवलग मित्राचा खून

एमपीसीन्यूज : राजगुरुनगर येथे मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. जमिनीच्या पैशाच्या वादावरून एका जिवलग मित्राने डोक्यात दगड घालून मित्राचा खून केला.

राहुल बाबाजी सावंत (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी हेमंत वाडेकर, शिवा कुडेकर अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, हेमंत वाडेकर आणि राहुल सावंत हे जिवलग मित्र होते. त्यांनी जमिनीच्या व्यवहारात पैसे लावले होते. या पैशावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होत होते. राहुल हा वारंवार हेमंत याच्याकडे पैशाची मागणी करत होता.

सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राहुल हा हेमंत, शिवा आणि आणखी एका मित्रासोबत दारू पिण्यासाठी राजगुरुनगर शहरालगत असलेल्या एका डोंगराच्या पायथ्याजवळ गेले होते.

दारू पिल्यानंतर जमिनीच्या पैशावरून त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. या रागाच्या भरात राहूल याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला.

दरम्यान, खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन आरोपींना त्याब्यात घेतले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सतीश गुरव करीत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.