Rajgurunagar News : पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या : आमदार दिलीप मोहिते पाटील

याबाबत आमदार मोहिते पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठविले आहे. : Give extension for payment of crop insurance: MLA Dilip Mohite Patil

एमपीसीन्यूज : खेड तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.

याबाबत आमदार मोहिते पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, खेड तालुक्यात पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने पीक विमा भरण्यासाठी 31  जुलै 2020 ही अंतिम तारीख घोषित केली होती. मात्र, सतत सर्व्हर डाऊन होण्यामुळे अनेक शेतकरऱ्यांना या मुदतीत पीक विम्याचे अर्ज सादर करणे शक्य झाले नाही.

त्यातच खेड तालुक्यात कोरोचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तसेच शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना विम्याचे अर्ज वेळेत सादर करता आलेले नाहीत.

शिवाय तालुक्यात कमी पाऊस पडल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पीक विमा अर्ज न भरलेले शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत.

त्यामुळे पीक विमा अर्ज भरणा करण्यासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी, अशी मागणी आमदार मोहिते पाटील यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.