Rajgurunagar : खेड तालुक्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करा : आमदार दिलीप मोहितेपाटील

Implement 15 days lockdown in Khed taluka: MLA Dilip Mohitepatil :खेड तालुक्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करा : आमदार दिलीप मोहितेपाटील

एमपीसीन्यूज : गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी तालुक्यात कमीत कमी 10  ते 15  दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करावा, अशी मागणी आमदार दिलीप मोहितेपाटील यांनी केली आहे.

खेड तालुकयातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आमदार मोहिते पाटील म्हणाले, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांचा एकमेकांसोबत संपर्क वाढू लागला.

तालुक्यातील व्यापारातही वाढ झाली. त्यामुळे खेड तालुक्यात कोरोनाचा संसर्गही वाढत आहे. गेल्या काही दिवसांत तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या शंभरी पार झाली आहे.

अशा परिस्थितीत कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनची गरज आहे. त्यामुळे तालुक्यात कमीत कमी 10  ते 15  दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करावा, अशी मागणी आमदार मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.