Rajgurunagar News : ‘जनता कर्फ्यू’मुळे चाकणचा बाजार शुक्रवारी व शनिवारी बंद

सभापती विनायक घुमटकर यांची माहिती

0

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात करण्यात येणाऱ्या जनता कर्फ्युमुळे चाकण (ता.खेड) येथिल शनिवारी भरणारा जनावरांचा बाजार तसेच रोहकल येथिल शेळी-मेंढी बाजार व चाकण मार्केट येत्या शुक्रवारी आणि शनिवारी बंद राहणार आहे. तर रविवारी हा बाजार नियमित सुरू राहणार असल्याची माहिती सभापती विनायक घुमटकर यांनी दिली.

खेड तालुक्यातील वाढती कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी तालुक्यातील रुग्णसंख्या वाढलेल्या गावांत शुक्रवारी दि. 18 व शनिवारी दि.19  सप्टेंबर रोजी घरोघरी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे.

या तपासणीला नागरिकांनी घरी थांबून प्रतिसाद द्यावा या हेतूने शुक्रवारी (दि.18) व शनिवारी (दि.19) राजगुरूनगर मुख्य बाजार आवार व चाकण, शेलपिंपळगाव येथील उपबाजार आवार अशा तीनही ठिकाणचे सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

तसेच शनिवारी भरणारा जनावरांचा बाजार रविवारी भरवला जाईल, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार सामितीने केलेल्या बदलाची दखल शेतकरी, व्यापारी, आडते व भाजीपाला, तरकारी विक्रेते यांनी घ्यावी, असे आवाहन सभापती विनायक घुमटकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.