Rajgurunagar News : कोरोना चाचण्यांच्या तारखेत बदल ; आता 18 व 19सप्टेंबरला होणार घरोघरी चाचणी

महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार घरोघरी कोविड चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

0

एमपीसीन्यूज :  राज्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” ह्या मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन चाचण्या करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार खेड तालुक्यात 16  व 17  सप्टेंबरला घरोघरी कोरोना चाचण्या करण्यात येणार होत्या. मात्र, बैल पोळा सणांमुळे या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, आता येत्या 18 आणि 19  सप्टेंबरला जनता कर्फ्यू  पाळून आरोग्य कर्मचारी घरोघरी कोविड चाचणी करणार आहेत. खेडच्या जनतेने त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले आहे.

सध्या खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार घरोघरी कोविड चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण एक कोरोनाबाधित व्यक्ती शंभर नागरिकांचे जीव धोक्यात घालू शकतो.

मी स्वतः. दोनवेळा कोरोना चाचणी केली आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक नागिरकाने कोरोना चाचणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. वेळीच उपचार केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे.

महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” ह्या मोहिमे अंतर्गत खेड तालुक्यात घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची होणार आरोग्य तपासणी होणार आहे. येत्या 18 आणि 19  सप्टेंबरला संपूर्ण तालुक्यात आरोग्य कर्मचारी घरोघरी कोविड चाचणीसाठी येणार आहेत.

आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तीविषयीची खरी माहिती आरोग्य कर्मचार्‍यांना द्यावी. जेणेकरून कोरोना महामारी आटोक्यात आणण्यात आपण यशस्वी होऊ. त्यासाठी जनतेने त्यांना योग्य सहकार्य करावे, खरी माहिती देऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आमदार मोहिते पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.