Rajgurunagar News : कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाने नैराश्यातून केली गळा कापून आत्महत्या

एमपीसी न्यूज – राजगुरूनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाने स्वःताचा गळा कापून केली आत्महत्या केली आहे. दुसऱ्या कोरोना चाचणीचा रिपोर्टही पॉझिटीव्ह येण्याच्या धास्तीने नैराश्य येऊन आत्महत्या केल्याचे माहिती पुढे येत आहे.

दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर (वय 60) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 23 जुलै रोजी त्यांची पहिली कोरोना चाचणी झाली. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उपचार घेतले, पण प्रकृती सुधारली नाही.

शुक्रवारी (दि. 7) त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. शनिवारी रिपोर्ट येणार होते. परंतु त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केली. शनिवारी सकाळी मुलगा झोपेतून उठवण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.