Rajgurunagar leopards News :राजगुरुनगर परिसरात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरातील सातकरस्थळ येथील एका शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात बिबट्या दिसत असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चा मात्र आता खऱ्या ठरल्या आहेत. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

राजगुरूनगर परिसरातील सातकरस्थळ याठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले होते. नागरिकांनी याची माहिती दिल्यानंतर खेड वनविभागाने या परिसरात पिंजरा बसवण्याची तयारीही केली होती.

परंतु, आज, गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास येथील एका शेतामध्ये नर जातीचा हा बिबट्या मृतावस्थेत सापडला. या बिबट्याचे वय अंदाजे सहा ते आठ महिने इतके आहे.

वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन या बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात हा बिबट ठार झाला असावा, असा अंदाज आहे. त्याच्या शरीरावर फाडल्याच्या आणि ओरबाडल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.