Rajgurunagar News : जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करा – दिलीप मोहिते पाटील

एमपीसीन्यूज ; राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे खेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायती या बिनविरोध व्हाव्यात. तसेच  आघाडीत बिघाडी होणार नाही याची काळजी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.

ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या सर्वाधिक ग्रामपंचायती कशा निवडून येतील यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे जातीचे दाखले व इतर जी काही मदत लागेल ती सर्व आम्ही करायला तयार आहोत.

तसेच जास्तीत जास्त ग्रामपंचायती या बिनविरोध कशा होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे लोकांमध्ये एकोपा राहिल व वाद-विवाद होणार नाहीत. शिवाय गावाचे गावपण टिकून राहील.

या वेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, महिला अध्यक्षा संध्या जाधव, माजी जि. प. सभापती अरूण चांभारे, सरचिटणीस उल्हास कुडेकर, उपाध्यक्षा कांचन ढमाले, युवती अध्यक्षा आशा तांबे, विलास कातोरे, रमेश राळे, ॲड. सुखदेव पानसरे, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, अशोक शेंडे, शहराध्यक्ष सुभाष होले, प्रभाकर जाधव, वैभव नाईकरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.