Rajgurunagar News : विजया शिंदे यांचा कै. मीराताई देशपांडे पुरस्काराने गौरव

एमपीसीन्यूज : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा विजया शिंदे यांना सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने कै. मीराताई देशपांडे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. विजया शिंदे या आजारी असल्याने त्यांच्या वतीने त्यांचा मुलगा मंदार व स्नुषा जयश्री यांनी हा पुरस्कार स्वीकारला. एकवीस हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष साहेबराव टकले, सचिव संगीता कांकरिया, संचालक निलेश ढमढेरे, डॉ.प्रिया महिंद्रे, रमेश वाणी, सुनील रुकरी, विजय ढेरे यांच्यासह विविध बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी असोसिएशनच्या वतीने राज्यातील नागरी सहकारी बँकेच्या महिला संचालकांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

यंदा राज्यातील नागरी सहकारी बँकेच्या दोन महिला संचालकांची उत्कृष्ठ महिला संचालिका म्हणून निवड करुन त्यांना कै. मीराताई देशपांडे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे येथील नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या सभागृहात नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.