Rajinikanth : काय… रजनीकांत करोना पॉझिटीव्ह? सांगणारा अभिनेता झाला ट्रोल

Rajinikanth : What... Rajinikanth's corona positive? The telling actor became a troll

एमपीसी न्यूज – करोना व्हायरसची लागण रजनीकांत यांनादेखील झाली असल्याचा जोक नुकताच सोशल मिडियावर आला होता. मात्र हा जोक शेअर करणा-या अभिनेत्याला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येत आहे. हा अभिनेता म्हणजे रोहित रॉय आहे.

त्याने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मजेशीर पोस्ट शेअर केली होती. ‘रजनीकांत करोना पॉझिटीव्ह आले. आता चक्क करोनालाच क्वारंटाइन करण्यात आले आहे’ असे रोहितने पोस्टमध्ये म्हटले होते. पण त्याची ही पोस्ट रजनीकांतच्या चाहत्यांना अजिबात आवडली नाही. त्यांनी रोहितला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

ट्रोल झाल्यानंतर काही वेळातच रोहितने पोस्टवर कमेंट केली आहे. ‘मित्रांनो जरा शांत व्हा… एक जोक केवळ जोक असतो.. हा एक रजनीकांत सरांच्या स्टाइलमधला टिपिकल जोक होता आणि मला या जोकने सर्वांना हसवायचे होते. कमेंट करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीने कोणत्या भावनेने पोस्ट केलं आहे हे देखील पाहायला हवे’ असे त्याने यावर उत्तर देताना म्हटले आहे.

याआधीदेखील रजनीकांत यांच्यावर अनेक मेसेज आले होते. एके वर्षी सहा डिसेंबरला म्हणजे रजनीकांत यांच्या वाढदिवशी वादळ आले होते. पण नंतर त्या वादळाने आपली दिशा बदलली. त्यावर रजनीकांत यांनी वाढदिवसाचा केक कापण्यासाठी फुंकर मारली तर ते वादळच दुसरीकडे गेले असा जोक व्हायरल झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.