Pimpri News : पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार प्रमुखपदी राजू शिंदे  

एमपीसी न्यूज – पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार प्रमुखपदी राजू शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. राजू शिंदे यांनी यापुर्वी देखील पिंपरी उपबाजार प्रमुखपदाची धुरा सांभाळली आहे. 

पिंपरी चिंचवडमधील पहिले फुल मार्केट सुरू करण्यात राजू शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांची बदली झाल्यानंतर शिंदे यांना पुन्हा पिंपरी उपबाजार प्रमुखपदी नियुक्त करावे अशी मागणी येथील व्यापारी आणि शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली होती. अखेर राजू शिंदे यांच्याकडे पुन्हा पिंपरी उपबाजार प्रमुखपद देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.