Rajya Sabha Election 2022 : भाजपच्या विजयाचे श्रेय पुण्याच्या ‘या’ दोन आमदारांना!

एमपीसी न्यूज : राज्यसभेच्या निवडणुकीचा (Rajya Sabha Election 2022) निकाल जाहीर झाला. भाजप आणि महाविकास आघाडीचे तीन आमदार राज्य सभेवर निवडून आले. शिवसेनेचे संजय पवार यांचा धनंजय महाडीक यांनी पराभव केला आणि हा विजय भाजपच्या नावे कोरला गेला. या विजयाचे श्रेय सर्वजण माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे श्रेय आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे असल्याचे म्हंटले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे आजारी आहेत. आपल्या मतदानाचा आणि पक्षनिष्ठतेचा हक्क बजावण्यासाठी दोघांनीही थेट रुग्णवाहिनीतून हजेरी लावली. त्यांच्या या हिंमतीला दाद देत भाजपने हा विजय त्यांच्या नावे घोषित केला आहे.

Sharad Pawar : माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीसांना यश, त्यांनी चमत्कार केला

भाजप असो वा महाविकास आघाडी (Rajya Sabha Election 2022) असो प्रत्येक पक्षाला आपल्या आमदारांचे एक एक मत महत्त्वाचे होते. ही लढाई प्रतिष्ठेची होती. या लढाईत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षासाठी मोठी मेहनत घेतली. त्यांनी महाविकास आघाडी न फोडता अपक्षांना आपल्या बाजूने करत हा विजय आपलासा केला. त्याचे कौतुक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही आवरले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.