Rajyasbha Election : छत्रपती संभाजीराजे होणार राज्यसभेचे शिवसेना पुरस्कृत उमेदवार!

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांचे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती (Rajyasbha Election) सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांआधी त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवणार असे जाहीर केले होते. परंतु, ते आता शिवसेना पुरस्कृत उमेदवार होणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

Maharashtra Petrol- Diesel : महाराष्ट्र शासनानेही कमी केले पेट्रोल-डिझेलचे दर; जाणून घ्या किंमती!

संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी गेले काही दिवस शिवसेनेच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू होता. अखेर संभाजीराजे यांना शिवसेनेचे पुरस्कृत आमदार होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. तसेच, ते शिवसेनेचे २२ वे आमदार म्हणूनच कार्यरत राहतील, अशी अट शिवसेने ठेवली होती. यावर संभाजीराजे यांनी मान्यता दिली नाही. उलटपक्षी त्यांना केवळ एका पक्षाची बांधिलकी नको होती. तर त्यांना सर्वपक्षीय किंवा महाविकास आघाडीचे एकमत हवे होते. या आग्रहाला शेवटी शिवसेनेने (Rajyasbha Election) संमती दर्शवली आहे.

Rajyasbha Election 2022

शरद पवार यांचे म्हणणे – 

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील संभाजीराजे यांच्या शिवसेना उमेदवारीवर सकारात्मकता दाखवली आहे. तसेच, त्यांनी ”शिवसेना जे नाव देईल त्याला आमचा पाठिंबा असेल” असे वक्तव्य करून संभाजीराजे राष्ट्रवादीत जातील की शिवसेनेत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

यावरून महाराष्ट्राच्या सहाही जागा खासदारकीच्या निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहावे उमेदवार म्हणून खासदार संभाजीराजे निवडून येण्याची शक्यता आहेच; त्यासोबत ते दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येणार आहेत. यामध्ये भाजप दोन जागेवर खासदारकी लढवणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.