Rakhi Paurnima : रंगीबिरंगी राख्यांनी फुलली बाजारपेठ

0

एमपीसी न्यूज – भाऊ-बहिणीचं गोड नातं आणखी दृढ करणारा रक्षाबंधन सण एक दिवसावर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही बंधने आहेत. मात्र, बहिणीकडून आवर्जून राखी खरेदी केली जात आहे. बाजारपेठेत विविध आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. चिंचवड, पिंपरी बाजारपेठ या रंगबिरंगी राख्यांनी फुलली आहे. 

राखी विक्रीचे बाजारात विविध ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले.यावर्षीचा रक्षाबंधन वरती कोरोना चे संकट असले तरी बाजारात विविध डिझाईन रंग आणि आकाराच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये सिल्व्हर, डिझायनर, सिंगल स्टोनमधील डायमंड राखी, वुलन गोंडा, रुद्राक्ष, लुम्बा, कपल आदी राख्यांना अधिक मागणी आहे.

चिंचवड येथील पोस्ट कार्यालयात बाहेरगावी राखी पाठविण्यासाठी विशेष खिडकी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनामुळे राखी विक्रीच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर फरक पडल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे विक्री 70 ते 75 टक्के घटली असल्याचे राखी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.