Pimpri : घरकाम करणाऱ्या महिलांना परिवहन अधिकाऱ्यांनी दिली रस्ते सुरक्षेची शपथ

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात घरकाम महिला सभेच्या वतीने अनोखे रक्षा बंधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात घरकाम महिला सभेच्या वतीने धुणी-भांडी, स्वयंपाक, साफसफाई कामगार महिलांनी आर.टी.ओ.अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधली. तसेच आर टी ओ अधिकाऱ्यांनी वाहतूक नियम पाळण्याची पट्टी महिलांच्या मनगटावर बांधून सुरक्षा नियम पाळण्याची शपथ दिली.

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर, मोटार वाहन निरीक्षक रघुनाथ कन्हेरकर, चंद्रकांत जावळकर, सचिन विधाते, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संदीप गोसावी, दत्तात्रय सनगर, अर्चना घाणेगांवकर आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील म्हणाले, ” रस्ते सुरक्षा नियम न पाळल्यामुळे अपघात होत आहेत ,महिलांनी ठरवले तर अपघातास आळा बसू शकतो”

रक्षा बंधनाएवढेच सुरक्षेला महत्त्व द्यावे असे आवाहन सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.