गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Rakshabandhan : सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून मिठाई गिफ्ट, रोटरी वाल्हेकरवाडीचा उपक्रम

एमपीसी न्यूज: आपला परिसर नियमित स्वच्छ सुंदर ठेवण्यास प्रयत्नशील राहून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या स्वछता दूताना आपुलकी आणि आपलेपणाची राखी बांधत (Rakshabandhan) रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व मा. नगरसेविका सौ. करुणाताई शेखर चिंचवडे यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी परिवारातील महिलांकडून चिंचवड विभागातील आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना राखी बांधून आपुलकीची भेट देत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला तसेच यावेळी कर्मचाऱ्यांना मिठाई भेट देण्यात आली. विशेष म्हणजे आज कार्यक्रमासाठी राख्या खास रावेत येथील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवल्या होते त्यास रोटरीच्या वतीने प्रोत्साहन देण्यात आले होते.

Pune electoral Roll: मतदार यादी शुद्धीकरणाबाबत पुणे जिल्ह्याची चांगली कामगिरी

यावेळी चिंचवड परिसरातील सफाई कर्मचारी,अधिकारी, मा. नगरसेविका करुणाताई चिंचवडे, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर सुभाष जयसिंघानिया, प्रेसिडेंट गणेश बोरा, राजेंद्र चिंचवडे, वसंत ढवळे तसेच रोटरीच्या अश्विनी खोले, रेश्मा बोरा, स्वाती वाल्हेकर, आशा चिंचवडे, माया वाल्हेकर, प्रणाली हरपुडे,(Rakshbandhan) प्रिती मुनोत,आरोग्य विभागाचे महादेव शिंदे, नीलम चिंचवडे, विद्या महाजन, डॉ मोहन पवार, प्रदीप वाल्हेकर, सचिन खोले, प्राजक्ता रुद्रवर सचिन काळभोर हे उपस्तित होते. अश्विनी खोले ह्यांनी प्रास्ताविक केले तर रेश्मा बोरा यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र चिंचवडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

 

spot_img
Latest news
Related news