Rakshabandhan : आळंदीमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : श्रावण महिन्याचे वेध लागतात आणि श्रावण महिना सुरु झाला की, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचे (Rakshabandhan) वेध लागतात. देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

भावा-बहिणीच्या नातेसंबंधाला जपणारा, त्यांचे नाते दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला प्रेमाची ओवाळणी देत तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो.

Today’s Horoscope 12 August 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आळंदीत महिला भगिनींची राखी खरेदीसाठी करण्यासाठी शहरातील दुकाने फुलून गेली होती. दुकानांमध्ये विविध प्रकारच्या राख्या त्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. काल सकाळपासूनच शहरात सर्वत्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या भगिनी आपल्या भावास राखी बांधून हा सण उत्साहात साजरा करत होत्या. तसेच काल श्री ज्ञानेश्वर विद्यालयात अंध विद्यार्थी भगिनीसह इतर विद्यार्थी  भगिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधत (Rakshabandhan) हा सण साजरा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.