Rotary Club of Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरीकडून खऱ्या हिरोंचे रक्षाबंधन

एमपीसी न्यूज – युद्धात हात, पाय गमावूनही (Rotary Club of Pimpri) जिद्द न गमावलेल्या खऱ्या हिरोंसोबत रोटरी क्लब ऑफ पिंपरीतर्फे राखी बांधून अनोखे रक्षाबंधन करण्यात आले. बास्केटबॉल स्विमिंग माऊथ पेंटिंग संगीत व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधून पारितोषिक मिळवलेल्यांचे यावेळी कौतुकही करण्यात आलं.

हा सोहळा खडकी येथील आपल्या सैनिकांसाठी असलेल्या पॅराप्लेजिक सेंटर येथे नुकताच पार पडला. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष संजय प्रधान, प्रथम महिला मधुरा प्रधान, सचिव संतोष गिरंजे रोहन व मेधा रोकडे व अन्य सभासद उपस्थित होते.

देशासाठी सर्वोच्च त्याग करणारे, युद्धामध्ये गंभीर स्वरूपाच्या अशा दुखापतींमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलेले हे सर्व देशातील विविध प्रांतातील सैनिकांवर उपचार करण्यात येणारे केंद्र आहे. अपंग असून देखील हे सैनिक विविध अशा कला संपन्न आहेत. बास्केटबॉल स्विमिंग माऊथ पेंटिंग संगीत व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधून (Rotary Club of Pimpri) पारितोषिक मिळवलेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.