Pune : लठ्ठपणाबाबत जागृतीसाठी रविवारी रॅली

एमपीसी न्यूज – जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त वाइब्स पुणे संस्थेतर्फे लठ्ठपणा विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. २५ नोव्हेंबर २०१८) सकाळी ७ वाजता भांडारकर रस्त्यावरील संस्थेच्या कार्यालयातून ही रॅली निघणार असून, विधी भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय, राष्ट्रीय चित्रपट संग्रहायलमार्गे प्रभात रस्ता, कर्वे रस्ता ते गुडलक चौक अशी ही रॅली असणार आहे. कल्याणीनगर परिसरातही संस्थेच्या वतीने लठ्ठपणा जागृतीसाठी रॅली काढण्यात येणार आहे. 

आरोग्य व सौंदर्य क्षेत्रात १९९६ पासून कार्यरत असलेल्या वाईब्स संस्थेकडून दरवर्षी जागतिक लठ्ठपणा दिनाच्या निमित्ताने लठ्ठपणाबाबत जनजागृती केली जाते. अनेक गंभीर आजारांच्या मुळाशी लठ्ठपणा असू शकतो. अतिरिक्त वजनामुळे रक्तदाब, हायकोलेस्ट्रॉल व शरीराच्या तक्रारींमुळे हार्ट अॅटॅकचा धोकाही वाढतो. अतिउच्च रक्तदाबाच्या ५० टक्क्यांहून अधिक केसमध्ये पेशंटना हा त्रास फक्त अधिक वजनामुळे होतो. वाढत्या वजनामुळे डायबेटिस होण्याचे प्रमाणही बरेच आहे. सांध्याचेही विकार जडतात. अतिरिक्त वजनामुळे सांध्याच्या नाजूक आवरणावरही ताण येतो. लठ्ठपणाशी निगडीत आजारांमध्ये निद्रानाश, हार्निया, वेरीकोज वेन्स, सांध्याचे विकार, मूत्राशयाचे आजार, श्वास अडकून अचानक मृत्यू, यासह श्वसनाच्या अनेक आजारांचा समावेश आहे. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्याची गरज असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे. अधिकाधिक नागरिकांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहनही संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.