BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : कै. राम गणेश गडकरी एकांकिका स्पर्धा १३ फेब्रुवारीला

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठानच्या वतीने कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित केल्याची माहिती राजू बंग यांनी दिली.

यंदाची ही २० वी स्पर्धा असून दि. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. ही स्पर्धा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी दि. ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील. पहिल्या २२ संघासच स्पर्धेत प्रवेश मिळु शकेल. स्पर्धेचे लॉटस शनिवार दि. ९ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजता काढण्यात येतील. अधिक माहितीसाठी राजेंद्र बंग मोबाईल नंबर – 9822313066 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.