Ram Kadam : राम कदम यांनी माफी मागावी; युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी 500 रुपयांच्या नोटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकत महापुरुषांशी बरोबरी केल्याचे एक ट्विट केल्याने युवक काँग्रेसकडून निषेध करण्यात आला.
राम कदम यांनी सोशल मीडियावर महापुरुषांचे फोटो नोटांवर लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बरोबरी केल्याने युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतप्त झाले आहेत. सर्वत्र राम कदम यांचा निषेध करून त्यांनी तत्काळ माफी मागण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांच्याबरोबर (Ram Kadam) फोटो लावून मोदी यांची बरोबरी केली, ही बाब निंदनीय आहे. या प्रकरणी राम कदम यांनी अखंड भारताची माफी मागावी, अन्यथा सर्व राजकीय पक्ष आणि संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करतील, असा इशाराही रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
https://youtu.be/QX7iLtFOkV0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.