Ram Mandir News : ‘या’ व्यक्तींनी दिल्या अयोध्येमधील राममंदिरासाठी देणग्या

एमपीसी न्यूज: अयोध्येमधील राम मंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने (दि. 15) पासून देणग्या जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

सर्वप्रथम देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या व कुटुंबियांच्यावतीने पाच लाख रुपयांची देणगी विश्व हिंदू परिषद आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांना दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कुटुंबियांनी यापूर्वीदेखील मंदिर उभारणीसाठी देणग्या दिल्या आहेत. गुजरातमधील गोविंदभाई ढोलकीया या हिरे व्यापाऱ्याने तब्बल 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जयंती कबुतरवाला या व्यापाऱ्याने 5 कोटींची देणगी दिली आहे. याचबरोबर गुजरातमधील अनेक व्यापारांनी देणग्या दिल्या आहेत. रायबरेतील सुरेंद्र सिंग यांनीही 1.11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

याचबरोबर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान व सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन लाख रुपये दिले असून उत्तराखंडाचे राज्यपाल बेबी रानी मौर्य यांनी एक लाख एकवीस हजारांची देणगी दिली आहे. ही देणग्या जमा करण्याची मोहीम 27 फेब्रुवारीपर्यंत आहे.

या मोहीमेत अनेक मुख्यमंत्री, राज्यपाल, व्यापारी, नागरिक मंदिर उभारणीसाठी देणग्या देत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.