Ram Mandir : असं असेल अयोध्येतील राम मंदिर…. पाहा फोटो फिचर!

एमपीसी न्यूज – अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अयोध्येतील राम मंदिर तयार होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. अयोध्येतील सोहळ्यासंबंधीची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. शिवाय अयोध्येत निमंत्रितांचे येणेही सुरु झाले आहे. अशात राम मंदिर निर्माणासाठी बनलेल्या राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराचे प्रस्तावित आराखड्याचे छायाचित्र जाहीर केली आहेत. मंदिराचे मॉडेल वास्तुकार निखिल सोमपुरा पांनी तयार केले आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रच्या वतीनं प्रस्तावित राम मंदिराचे फोटो सार्वजनिक करण्यात आले आहेत.मंदिराच्या कळसाची उंची 161 फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती 6 फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराला 5 कळस व पाच प्रवेशद्वार असणार आहेत.

भव्य रचना रचना असलेले हे मंदिर पाच मजली असणार आहे. तसेच मंदिरात सिता रसोई देखील उभारली जाणार आहे. हे मंदिर पूर्व पूर्ण होण्यासाठी साधारण तीन वर्षाचा काळ अपेक्षित धरला जात आहे.राम मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजित खर्च 300 कोटी रुपये इतका असणार आहे. तर परिसरातील 20 एकर जागेचं सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल एक हजार कोटी इतका खर्च असणार आहे. यासाठी देणग्या येण्यास प्रारंभही झाला आहे.

(फोटो – राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्वीटर हॅंडल वरुन)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.