Pune : पवारांचे निकटवर्तीय लक्ष्मीकांत खबिया यांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या लक्ष्मीकांत खाबिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य आणि पवार कुटुंबाशी जवळचे संबंध असणाऱ्या खाबिया यांनी अचानक राजीनामा दिल्याने कला, साहित्य, क्रीडा, क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी अचानक राजीनामा का दिला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी एड्स आणि स्त्री भ्रूण हत्या यासारख्या सामाजिक आणि संवेदनशील विषयावर सामाजिक प्रबोधनाचे कामही केले आहे. शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून कला आणि क्रीडा क्षेत्रात काम करीत असलेल्या खाबिया यांनी अचानक राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.