Pimpri : रमजान म्हणजे आत्मशुद्धी व मन:शांतीचा मानवतावादी मार्ग – आमदार चाबुकस्वार

एमपीसी  न्यूज –  मानवतावादी कल्याणाचा मार्ग आत्मशुद्धी व मन:शांतीतून रमजानद्वारे प्राप्त होत असल्याने जगात या पवित्र दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याची भावना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज येथे व्यक्त केली.

लिंक रोड पिंपरी येथील मुस्लीम कब्रस्तान मस्जिद येथे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये ते बोलत होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष इरफान सय्यद, हाजी दस्तगीर यांच्यासह पोलीस अधिकारी बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार चाबुकस्वार व पोलीस आयुक्तांचा मस्जिदच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला.  यावेळी आयुक्त पद्मनाभन यांनी, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना या पार्टीमध्ये बोलावून संवाद, विकास व समतेचे चांगले कार्य मस्जिदच्या पदाधिकाऱ्यांनी  केल्याचे म्हटले. शेकडो प्रकारचे खजूर, सुकामेवा यावेळी पाहुण्यांच्या सरबराईसाठी ठेवण्यात आला होता. त्याचा सर्वांनी स्वाद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.