Pune : ‘मराठा रत्न व मराठा मित्र ‘ पुरस्काराने रामभाऊ जाधव यांचा गौरव

एमपीसी न्यूज – छावा मराठा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा कोकण संपर्क प्रमुख रामभाऊ जाधव यांचा ‘मराठा रत्न व मराठा मित्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विलास पांगारकर यांनी सांगितले, की राम जाधव हे समाजातील विविध घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी झोकून देऊन काम करीत आहेत. मराठा आरक्षण मिळावे, यासाठी त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे.यावेळी संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी ज्या कार्यकर्त्यांनी समाज हितासाठी संघर्ष केला, त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांनी झोकून देऊन समाजासाठी काम केल्यास मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय मिळू शकतो. राम जाधव यांनी आपले काम असेच पुढे सुरू ठेवावे, असे किशोर चव्हाण म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.