BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरीच्या आमदारांबाबत रामदास आठवले म्हणतात…

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी मतदारसंघावर आरपीआयने दावा केला आहे. या जागेवर आमचा हक्क असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजपचे देखील अर्धाडझन जण इच्छुक आहे. तर, विद्यमान आमदार शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार आहेत.

पिंपरी मतदारसंघ कोणाकडे सुटतो. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आले होते. व्यासपीठावार पदाधिका-यांसह विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार देखील उपस्थित होते.

व्यासपीठावरील मान्यवरांची नावे घेत असताना गौतम चाबुकस्वार यांचे नाव घेताना आठवले यांनी पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार आहेत. पुढील वेळी बघू काय होते, अशी टिप्पणी करताच हस्यकल्लोळ उडाला. चाबुकस्वार आमचे मित्र असून ते अनेकवेळा निवडून आले आहेत, असेही आठवले यांनी म्हटले आहे.

भीमसृष्टीमध्ये “मनुस्मृती दहनाचे” म्युरल्स बसविण्याचा आयुक्तांना आदेश

भीमसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावरील 19 प्रसंगाचे म्युरल्स बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये “मनुस्मृती दहनाचे” म्युरल्स बसविण्याची मागणी नागरिकांची आहे. त्यातून कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. तो इतिहास आहे. त्यामुळे “मनुस्मृती दहनाचे” म्युरल्स बसविण्याचा आदेश आठवले यांनी व्यासपीठावर असलेल्या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3