Ramdas Athawale: अस्पृश्यांसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली, ही मोठी क्रांती – रामदास आठवले

एमपीसी न्यूज- महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे शहरात 1852 मध्ये अस्पृश्य, दलित विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली. ही त्यावेळी फार मोठी क्रांती होती. हाच वसा पुढे घेऊन जात कालकथीत एम.डी. शेवाळे यांनी डी.सी.एम. सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य पुढे सुरू ठेवले, ही स्तुत्य गोष्ट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.

महात्मा जोतिराव फुले वं सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यांसाठी सुरु केलेल्या पहिल्या शाळेचे ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालयात’ रूपांतर आणि कालकथीत एम.डी. शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्मरणिका व दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, संस्थेचे जनरल सेक्रेटरी व आरपीआयचे राष्ट्रीय खजिनदार विशाल शेवाळे, अध्यक्ष डी. टी. रजपूत, शिल्पताई भोसले, काजल शेवाळे,  वर्षा पाटील, सिद्धार्थ शेवाळे, अविनाश बागवे, परशुराम वाडेकर, सुनीता वाडेकर, प्रदीप चव्हाण, अजय भोसले, राजाभाऊ सरोदे, प्राचार्य डॉ. नरेश पोटे, उपप्राचार्य डॉ. जे.के. म्हस्के, डॉ. बाळासाहेब सोनवणे, संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, की कालकथीत एम.डी. शेवाळे हे रिपब्लिकन ऐक्यवेळी ते माझ्यासोबत ठामपणे उभे राहिले होते. ते एक अभ्यासू नेते होते. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. राजकीय क्षेत्रातही ते अग्रेसर भूमिका मांडत. त्यांनी अनेक युवकांना मदत करीत राजकारण व समाजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले. तसेच डी.सी.एम. सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे रोपटे बहरत असून, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने या संस्थेला नवीन अभ्यासशाखा सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच विशाल शेवाळे यांना महापालिका निवडणुकीत मदत करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

Nirmala Sitharaman : केंद्रपुरस्कृत योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी यंत्रणा गतीमान करा – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश जमदाडे यांनी, सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी, तर आभार शुभदा नगरकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.