Ramdas Athawale’s Poetry : ‘गो कोरोना’ नंतर रामदास आठवले म्हणतात ‘नो कोरोना, कोरोना नो’

एमपीसी न्यूज – कोरोनाचा देशात शिरकाव सुरू झाला तेव्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हातात मेणबत्ती घेऊन ‘गो कोरोना, कोरोना गो’ अशा घोषणा दिल्या होत्या. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी ‘नो कोरोना, कोरोना नो’ अशी नवी घोषणा दिली आहे.

देशात सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा या जीवघेण्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याची सूचना वारंवार केली जात होती. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यावेळी आपल्या सहकाऱ्यांसह हातात मेणबत्ती घेऊन ‘गो कोरोना, कोरोना गो’ अशा घोषणा दिल्या. कोरोना देशातून हद्दपार व्हावा यासाठी आम्ही या घोषणा दिल्या असल्याचा युक्तिवाद त्यांनी त्यावेळेस केला होता.

दरम्यान, आठवले यांच्या गो कोरोना या घोषणेनंतर सोशल मीडिया मध्ये ती चांगलीच व्हायरल झाली होती. एवढेच नव्हे त्यावर अनेक मीम्स आणि गाणी देखील तयार करण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.