Talegaon Dabhade News : रामदास काकडे यांनी तळेगावातील क्रशर उद्योगात आणला परदेशातील क्रशर उद्योगाला लाजवेल एवढा नीटनेटकेपणा 

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे यांचे गौरवोद्गार

एमपीसी न्यूज – उत्तम व्यवस्थापन कौशल्य आणि विशेष परिश्रमातून आरएमके उद्योग समुहाचे संस्थापक संचालक रामदास काकडे हे यशस्वी उद्योजक बनले आहेत. परदेशातील क्रशर उद्योगालाही लाजवेल इतका टापटीप आणि नीटनेटकेपणा तळेगावातील स्टोन क्रशर उद्योगात काकडे यांनी आणला, असे गौरवोद्गार क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे यांनी काढले.

तळेगाव दाभाडे येथील आरएमके उद्योग समुहाच्या 960 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पासह 200 टन प्रति तास क्षमतेच्या मंगरुळ (मावळ) स्थित क्रशर प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फरांदे बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप कंद, रामभाऊ दाभाडे, मावळ तालुका स्टोन खाण व क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष विलास काळोखे, योगेश ससाणे, गणेश भापकर, शैलेश शहा, सुहास भोते, गंगाराम मातेरे, संजय पाटील, परेश पारेख, किरण काकडे, नितीन किबे, प्रकाश शहा, सुनंदा काकडे, जयश्री पारेख, अंजली किबे, युवराज काकडे, विक्रम काकडे, संतोष देशमुख, सचिन पायगुडे आदी उपस्थित होते.

“नवोदित उद्योजकांनी रामदास काकडे यांचा आदर्श घेऊन व्यवसाय करायला हवा. त्यामुळे यश नक्कीच मिळेल. नवोदितांनी अभ्यासावा इतपत तळेगाव परिसरातील स्टोन क्रशर उद्योग आधुनिक बनला असल्याचेही अनिल फरांदे म्हणाले.

उद्योगपती हा माणूस म्हणून सर्वांशी चांगला वागला तर व्यवसायाला नक्कीच चांगली दिशा मिळेल, असा सल्ला नवोदित खाण उद्योजकांना प्रदीप कंद यांनी दिला.

पुणे जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप कंद, रामभाऊ दाभाडे, शैलेश शाह आदींनी मनोगत व्यक्त करून प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. आरएमके उद्योग समुहाचे संस्थापक संचालक रामदास काकडे यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन विशाल कुमावत यांनी केले तर आभार तुषार लोखंडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.