Ramdev Baba : कोरोना संसर्गावर औषध शोधल्याचा योगगुरु रामदेवबाबा यांचा दावा!

Ramdev Baba: Yoga guru Ramdev Baba claims to have found a medicine for corona infection! कोरोना संसर्गावर औषध शोधल्याचा दावा योगगुरु रामदेवबाबा यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार या औषधामुळे रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशात झपाट्याने वाढत असताना सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कोरोना विषाणू संसर्गावर औषध सापडलं असून रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के असल्याचा दावा योगगुरु रामदेवबाबा यांनी केला आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. बाबांच्या दाव्यानुसार त्यांच्या औषधाची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे.

जगभरात आतापर्यंत 75 लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. भारतातही या कोरोन बाधित रुग्णांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना विषाणूवर अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. जगात अनेक देश कोरोनाच्या लस आणि औषधावर प्रयोग करत आहेत. भारतातही अशा प्रकारचे प्रयोग सुरू आहे.

अशातच योगगुरु म्हणून प्रसिद्ध असलेले रामदेवबाबा यांनी कोरोनावर औषध शोधले असल्याचा दावा केला आहे. या औषधाची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली असून काही दिवसांतच त्यांच्या मानवी चाचणीचेही निकाल हाती येतील, असा दावा रामदेवबाबा यांनी केला.

या औषधाने रुग्णांची रिकव्हरी मोठी

_MPC_DIR_MPU_II

या औषधाने होणारी रुग्णांची रिकव्हरी मोठी आहे. बाबांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनासाठी 500 वैज्ञानिकांची मोठी टीम आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर वेगवेगळ्या रोगांवर औषध शोधण्याचं प्रमाण सातत्यानं पतंजली करत आहे. याच वैज्ञानिकांनी मिळून कोरोना संसर्गावर औषध शोधल्याचे त्यांनी सांगितले. रामदेव बाबा यांचा हा दावा खरा असेल तर नक्कीच सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

पाहा ‘माझा कट्टा’वरील योगगुरू रामदेव बाबा यांची संपूर्ण मुलाखत….

व्हिडिओ सौजन्य – एबीपी माझा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.